आरक्षित शाळेची जागा महापालिकेने ताब्यात घ्यावी
-शिवसेना उपशहर प्रमुख कुणाल तापकीर यांची मागणी.
चऱ्होली । लोकवार्ता-
वडमुखवाडी येथे सर्वे क्रमांक १ मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची २००२ ते २००७ च्या दरम्यान बांधण्यात आलेली शाळा आहे. सदर शाळेमध्ये फक्त इयत्ता चौथी पर्यंत अभ्यासक्रम शिकविला जात होता. याच शाळेच्या शेजारील जागेमध्ये आरक्षण क्रमांक २/४५ अन्वये शाळेसाठी जागा आरक्षित आहे. परंतु सदरची जागा ही शासनाच्या शेतकी महाविद्यालयाच्या ताब्यामध्ये आहे.

सदरची जागा शासनाच्या ताब्यामधून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये घेण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि सदर ठिकाणी वडमुखवाडी मधील ग्रामस्थांसाठी अत्याधुनिक जिम, विरंगुळा केंद्र व छोटे मैदान करता येईल याची पाहणी करावी. अशी मागणी उपशहर प्रमुख कुणाल तापकीर यांनी केली आहे. त्याचबरोबर वडमुखवाडी येथे अंगणवाडी सेविकांना जागा उपलब्ध नसल्याने त्यांना पालिकेच्या शाळेत एका कोपर्यात आपला वर्ग भरवावा लागतो. तरी साईमंदिर-वडमुखवाडी येथील नागरिकांसाठी याठिकाणी अंगणवाडी साठी सुद्धा स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी विनंती करण्यात शिवसेना उपशहरप्रमुख कुणाल तापकीर यांच्या द्वारे आली आहे.