लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

महापालिकेसाठी चिंचवड विधानसभेची जबाबदारी आता आमदार बंधू शंकर जगताप यांच्याकडे

पिंपरी | लोकवार्ता-

भारतीय जनता पार्टीने शंकर जगताप यांची निवड केली असून निवडणूक सहाय्यकपदी वाकड येथील संतोष कलाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जगताप आणि कलाटे यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. शंकर जगताप यांच्याकडे संघटन कौशल्य आहे. त्यांनी २०१७ ची महापालिका निवडणूक तसेच २०१४ आणि २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रचार आणि पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी चांगले काम केले. बंधू आमदार असले तरी त्यांनी कधीही राजकारणात बडेजावपणा मिरवलेला नाही. जमिनीवर राहून पक्ष कार्यकर्त्यांना ताकद देणे, पक्षाचे काम नागरिकांपर्यंत पोहोचवणे, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा गरजू नागरिकांना लाभ मिळवून देणे तसेच आरोग्य शिबीरांच्या माध्यमातून नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांनी काम केले आहे. त्या माध्यमातून चिंचवड विधानसभा मतदारसंघात त्यांनी आपले मोठे सामाजिक कार्य उभे केलेले आहे.

या कामाची दखल घेऊन भाजपाने आगामी महापालिका निवडणुकीसाठी शंकर जगताप यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या नियुक्तीला खप मोठा अर्थ आहे. आगामी महापालिका निवडणुकीत आपल्या संघटन कौशल्याने भाजपाला मोठे यश मिळवून द्याल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी निवडीबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले. २०१७ च्या निवडणुकीत महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपने गेल्या पाच वर्षात शहराच्या विकासाला गती दिली आहे. शहरातील नागरिकांसाठी उत्तम प्रकारे काम केले आहे. दीड-दोन वर्षे कोरोनाचे संकट असतानाही महापालिकेमार्फत नागरिकांना मदत तसेच विकासकामे पूर्ण करण्यावर भाजपाने भर दिला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षात शहरात झालेल्या विकासकामांच्या जोरावरच आम्ही पक्षाचे सर्व पदाधिकारी, आजी व माजी नगरसेवक तसेच कार्यकर्ते आगामी महापालिका निवडणुकीतही पुन्हा शत प्रतिशत भाजपचीच सत्ता आणू, असा विश्वास शंकर जगताप यांनी व्यक्त केला आहे.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani