“दिघीतील सीएमई सीमाभिंतीलगतच्या रस्त्याला अखेर गती”
– स्थानिक नगरसेवकांचा यशस्वी पाठपुरावा.
भोसरी । लोकवार्ता-
दिघी येथील धर्मवीर संभाजी महाराज चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी सीएमई सीमाभिंतीलगतच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यामुळे भोसरी-दिघी अंतर कमी होणार असून, नागरिकांचा वेळ वाचणार आहे.
सीएमई लगतच्या रस्त्याचे भूमिपूजन सोमवारी सकाळी करण्यात आले. यावेळी नगरसेवक विकास डोळस, निर्मला गायकवाड, चेतन घुले, संजय गायकवाड, उदय गायकवाड, आबा परांडे, प्रमोद पठारे यांच्यासह स्थानिक नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.

नगरसेवक विकास डोळस म्हणाले की, दिघीतील धर्मवीर संभाजी महाराज चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्थानिक नगरसेवकांच्या पुढाकाराने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्याला यश मिळाले. सीएमई सीमाभिंतीलगत होणाऱ्या रस्त्यामुळे पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे दिघी- भोसरीतील अंतर कमी होणार असून, नागरिकांचा वेळ आणि इंधनाचीही बचत होणार आहे.