लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

देशात ७३ दिवसांत प्रथमच रुग्णांची संख्या आठ लाखांच्या खाली

देशात कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसत आहे

lokvarta

लोकवार्ता।प्रतिनिधी

कोरोनाची दुसरी लाट देशात आता हळूहळू ओसरताना दिसत आहे. देशातल्या नवबाधितांची, मृतांची संख्या हेच सांगतेय. अद्यापही कोरोनाचा धोका कायम असला तरीही कमी होणारी संख्या ही आशादायी बाब आहे. गेल्या ७३ दिवसांत प्रथमच काल दिवसभरातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आठ लाखांच्या खाली आली आहे.

http://silversakshi.in/
http://silversakshi.in/

काल दिवसभरात ८८हजार ९७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनामुक्तांची एकूण संख्या आता दोन कोटी ८५ लाख ८० हजार ७४७ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात देशातल्या १ हजार ५८७ बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातल्या मृतांची एकूण संख्या आता तीन लाख ८३ हजार ४९० वर पोहोचली आहे.

देशात गेल्या २४ तासात ६२ हजार ४८० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या सात लाख ९८ हजार ६५६ वर पोहोचली आहे. आत्तापर्यंत ही संख्या कायम आठ लाखांच्या वरच होती. मात्र, गेल्या ७३ दिवसांत पहिल्यांदाच या संख्येत घट झाल्याचं दिसून येत आहे.

लसीकरणः
देशात गेल्या २४ तासात ३२ लाख ५९ हजार ३ लाभार्थ्यांनी करोना प्रतिबंधक लस घेतली. त्यापैकी पहिला डोस २८ लाख ५४ हजार २२० नागरिकांनी घेतला. तर चार लाख ४ हजार ७८३ जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे लसीकरण झालेल्या एकूण नागरिकांची संख्या आता २६ कोटी ८९ लाख ६० हजार ३९९ वर पोहोचली आहे.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani