जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीनेच होणार
तब्बल ५८६ झेडपी शिक्षकांच्या होणार बदल्या.
पुणे | लोकवार्ता
शिक्षकांच्या ऑफलाईन बदल्यांमध्ये मोठी आर्थिक देवाण-घेवाण होते. हे सर्व टाळण्यासाठी शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला. यामध्ये जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइनच होणार असल्याचे आता स्पष्ट झाले. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. पुणे जिल्हा परिषेतून महापालिकेच्या समाविष्ट 23 गावांमध्ये 586 शिक्षकांच्या बदल्या या केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे यासर्व बदल्या ऑनलाइन होणार आहेत. बदलीसाठी शिक्षकांना ऑनलाइन पध्दतीने अर्ज करावा लागणार आहे. यामध्ये शिक्षकांनी भरलेली सर्व माहिती इतरही शिक्षकांना बघता येईल.

यंदा मात्र बदलीसंदर्भातील आलेल्या सर्व त्रुटी दूर करण्यात आल्या. ऑनलाइन अर्ज प्रणाली अधिक सोपी करण्यावर शासनाने भर दिला आहे. विशेष म्हणजे यानंतरही आता ऑनलाइन पध्दतीनेच शिक्षकांच्या बदल्या केल्या जातील आॅफलाईन पध्दतीने बदल्या या बंद करण्यात येणार असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी गेल्या वर्षीच्या तुलनेत संगणक प्रणालीमध्ये अनेक महत्वाचे बदलही करण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे एखाद्या शिक्षकाने बदली अर्जामध्ये चुकीची माहिती टाकली असेल तर तसे करता येणार नाहीये. कारण शिक्षकांचा बदली अर्ज कोणीही पाहू शकणार आहे. यामुळे चुकीचे किंवी खोटी माहिती शिक्षकांना भरता येणार नाहीये.