भारतीय संविधानाची मूल्ये तरुणांमध्ये रुजली पाहिजे -माजी महापौर नितीन काळजे
– चऱ्होली बु. येथे संविधान दिनी महामानवांना अभिवादन
– भाजपा कोशाध्यक्ष सचिन तापकीर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
पिंपरी | लोकवार्ता-
भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिला गेला आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणांमध्ये सविधानाचे मूल्य रुजविणे हा या मागे साजरा करण्याचा एकमेव उद्देश आहे, असे मत माजी महापौर तथा नगरसेवक नितीन काळजे यांनी केले.
चऱ्होली बु. येथे संविधान दिनानिमित्त महामानवांना अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी महापौर तथा नगरसेवक नितीन काळजे, भाजप कोषाध्यक्ष सचिन तापकीर, अजित बुर्डे, भाऊसाहेब रासकर, सोमनाथ घारे आदी मान्यवर उपस्थित होती.

माजी महापौर नितीन काळजे म्हणाले की, २६ जानेवारी हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक विशेष दिवस आहे. या दिवशी देशभरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताने औपचारिकपणे संविधान स्वीकारले हे संविधान२६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण २ वर्षे ११ महिने १८ दिवस लागले. आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ.भीमराव आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्याचे प्रतिक म्हणून संविधान दिन साजरा केला जातो यावेळी नितीन आप्पा काळजे यांनी सांगितले तसेच यावेळी सर्वांच्या उपस्थितीत संविधानाचे वाचन करण्यात आले.