अखेर प्रतीक्षा संपली… !उद्या दुपारी लागणार बारावीचा निकाल!
-शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती.
पुणे । लोकवार्ता
कोरोना संपल्यानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन पद्धतीने बारावी ची परीक्षा पार पडली होती.अनेक अडचणीनंतर राज्यात महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षांचं आयोजन करण्यात आलं. परीक्षा घेऊन झाल्या आणि एक नवीन अडचण समोर उभी राहिली. महाराष्ट्रातील विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी पेपर चेकिंगवर बहिष्कार टाकला आणि बारावीचा रिझल्ट कसा लागणार आणि कधी लागणार असा प्रश्न सगळ्यांना पडला. खरं तर यासगळ्या प्रकारामुळे बारावीचा रिझल्ट उशिराच लागणार असं सगळ्यांना वाटू लागलं. पण अखेर आज प्रतीक्षा संपलेली आहे. बारावीचा रिझल्ट दणक्यात आणि सांगितलेल्या वेळेत जाहीर करण्यात आलेला आहे. हा रिझल्ट तुम्हाला महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर मिळू शकतो. उद्या 8 जून 2022 रोजी बारावीचा निकाल दुपारी एक वाजता लागणार आहे.

वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार बारावीचा निकाल अगदी वेळेत लागणार आहे. उद्या दुपारी एक वाजता निकाल लागणार. हा निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या (Maharashtra Board) अधिकृत वेबसाईटवर www.mahahsscboard.in बघायला मिळणार आहे. निकाल पाहण्यासाठी स्वतःचा परीक्षेचा सीट नंबर/ रोल नंबर, आईचं नाव माहिती असणं आवश्यक आहे. लवकरात लवकर या वेबसाईटला भेट द्या आणि आपला रिझल्ट चेक करा.