लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

दिघी परिसरातील भूमिगत केबलचे काम अखेर मार्गी

आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून प्रश्न सुटला. उपमहापौर हिरानानी घुले, कामगार नेते सचिन लांडगे, हभप दत्ताआबा गायकवाड यांच्याहस्ते भूमिपूजन.

पिंपरी |लोकवार्ता-

दिघी येथे दत्तनगर कॉलनी नं. १, २, ३ व साईपार्क या ठिकाणी लघुदाब वाहिनी भूमिगत करण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न निकालात निघाला आहे.
दत्तनगर, साईपार्क व माउली नगरमध्ये भूमिगत केबल कामाचे उद् घाटन बुधवारी करण्यात आले. यावेळी उपमहापौर हिरानानी घुले, कामगार नेते सचिन लांडगे, नगरसेविका निर्मला गायकवाड, माजी नगरसेवक हभप दत्ताआबा गायकवाड, नगरसेवक विकास डोळस, भाजपा युवा मोर्चा भोसरी-चऱ्होली मंडलाचे अध्यक्ष उदय गायकवाड, संजय गायकवाड, कुलदीप परांडे, दत्ता डोळस, दत्तात्रय परांडे यांच्यासह महावितरण प्रशासनाचे अधिकारी व  स्थानिक नागरिक उपस्थित होते.

lokvarta
lokvarta


गेल्या २० वर्षांपासून वीजवाहक तारा या धोकादायक पद्धतीने खांबावर लटकलेल्या दिसत होत्या. स्थानिक नागरिक व महिलांनी या वाहिन्या भूमिगत कराव्यात, अशी मागणी होती. परिसरात लहान मुले खेळत असताना वीजवाहक तारा या धोकादायक स्थितीत असल्यामुळे नादुरूस्त झालेल्या होत्या. त्या अनेकवेळा जमिनीवर पडल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु, सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. भविष्यात कोणतीही दुर्घटना होवू नये. याकरिता स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत वीजवाहिन्या भूमिगत करण्यासाठी भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्याकडे मागणी केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज भूमिगत केबलचे काम मार्गी लागले आहे.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani