मुख्यमंत्री घेणार पंतप्रधानांची भेट; कोरोना स्थितीबाबत चर्चा होण्याची शक्यता
केंद्रीय मंत्री आणि राज्यातील नेत्यांमध्ये अनेकदा शाब्दिक युद्धही रंगलं

लोकवार्ता।प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदीची भेट घेणार आहेत. मंगळवारी दिल्लीत ही भेट होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात राज्यातील कोरोना स्थितीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असणाऱ्या महाराष्ट्रात नुकतेच निर्बंध शिथील करण्यात आले असून मुंबई तसंच राज्याच्या कामगिरीची दखल देशपातळीवर घेण्यात आली आहे. यादरम्यान केंद्रीय मंत्री आणि राज्यातील नेत्यांमध्ये अनेकदा शाब्दिक युद्धही रंगलं. त्यामुळे या बैठकीत अजून कोणती चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात राज्य सरकारं, विरोध आणि वैद्यकीय तज्ञांकडून टीका होत असलेल्या राष्ट्रीय लसीकरण धोरणावर भाष्य करण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टानेही या प्रकरणावरुन केंद्राला सुनावलं होतं.
दरम्यान महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही आठवड्यांपासून घट होत असल्याने दिलासा मिळाला आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रात जवळपास ६० लाख रुग्ण आढलले असून एप्रिलच्या अखेपर्यंत सात लाखांपर्यंत असणारी अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आता कमी झाली आहे.
राज्यात गेल्या २४ तासांत १२ हजार ५५७ नव्या रुग्णांची आणि ६१८ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली असून यासोबत कोरोनामुळे मृत्यू झालेली संख्या एक लाखांच्या पुढे पोहोचली आहे.
नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी लसीकरणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका मांडली. “कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसोबतची भारताची लढाई सुरूच आहे. जगातील इतर देशांप्रमाणे भारतही दुसऱ्या लाटेत मोठ्या संकटातून जात आहे. अनेकांनी आपल्या प्रिय माणसांना गमावलं आहे. शंभर वर्षानंतर ही महामारी आली आहे. इतक्या मोठ्या संकटाशी भारत अनेक आघाड्यांवर लढला आहे. रुग्णालये, उपचार सुविधा उभारण्यापासून ते ऑक्सिजन पुरवठ्यापर्यंत भारताने काम केलं. आरोग्य सुविधा उभारल्या. एप्रिल आणि मे मध्ये भारतात ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली होती. ही मागणी पुर्ण करण्यासाठी पुर्ण प्रयत्न केले गेले. खूप कमी वेळात ऑक्सिजनचं उत्पादन १० टक्क्यांनी वाढवण्यात आलं. जगभरातून ऑक्सिजन मागवला. याच पद्धतीने जीवनरक्षण औषधांचं उत्पादनही वाढवण्यातं आलं. रुप बदलणाऱ्या या शत्रूविरोधात मास्क, सहा फूटांचं अंतर हेच सूत्र आहे,” असं आवाहन मोदींनी केलं.