हा आहे जगातील सर्वात महागडा आंबा २ लाख ७० हजार रुपये किलो…!
जाणून घ्या जगातील सर्वात महाग आंब्याबद्दल

लोकवार्ता।प्रतिनिधी
मध्य प्रदेशमधील एका शेतकऱ्याने दोन आंब्याच्या झाडांच्या संरक्षणासाठी पहारेकरी आणि कुत्र्यांची व्यवस्था केली आहे. या बागेतून आंब्याची चोरी होऊ नये म्हणून शेतकऱ्याने ही खास व्यवस्था केली आहे. इतकी सुरक्षा पुरवण्यामागे खास कारण देखील आहे. ते म्हणजे मियाझाकी आंब्याचे झाड.

मियाझाकी आंबा मुख्यत्वे जपानमध्ये पिकवला जातो. एका व्यक्तीने ट्रेनमध्ये रोपट्याचे बी दिले, असे या शेतकऱ्याचे म्हणणे आहे. जेव्हा राणी आणि संकल्प परिहार या जोडप्याने आपल्या फळबागेत यांनी एका वर्षांपूर्वी दोन आंब्याची रोपे लावली तेव्हा त्यांना वाटले की ते मध्य प्रदेशातील जबलपूरमधील त्यांच्या इतर झाडांप्रमाणे वाढतील. मात्र या झाडाला लाल रंगाचा आंबा आल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यांनी याबद्दल अधिक माहिती गोळा केल्यावर हा मियाझाकी आंबा असल्याचे त्यांना कळले.
गेल्या वर्षी चोरट्यांनी बागेतून आंब्याची चोरी केल्याने परिहार यांनी यावेळी या झाडांच्या संरक्षणासाठी चार रक्षक आणि सहा कुत्रे तैनात केले आहेत. हा आंबा भारतात क्वचितच पिकवला जातो आणि त्याला सूर्याची अंडी म्हणूनही ओळखले जाते. हे आंबे जपानच्या कुयूशु प्रदेशात मियाझाकी शहरात पिकवले जातात. घेतले जातात. या आंब्यांचे वजन ३५० ग्रॅम आहे आणि त्यात साखराचे प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
जाणून घ्या जगातील सर्वात महाग आंब्याबद्दल
जपानमधील मियाझाकी स्थानिक उत्पादने आणि व्यापार केंद्राच्या मते एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान पीक कापणीच्या वेळी या आंब्यांची लागवड केली जाते. मियाझाकी आंबे जगातील सर्वात महागडे आहेत आणि गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति किलो २.७० लाखांना याची विक्री झाल्याचे जपानी माध्यमांच्या अहवालात म्हटले आहे.
मियाझाकी हा एक प्रकारचा “इरविन” आंबा आहे जो दक्षिणपूर्व आशियात मोठ्या प्रमाणात पिकवण्यात येणाऱ्या पिवळ्या पेलिकन आंब्यापेक्षा वेगळा आहे, असे जपानी व्यापार संवर्धन केंद्राचे म्हणणे आहे. मियाझाकीचे आंब्यांची संपूर्ण जपानमध्ये विक्री केली जाते. हे आंबे अँटिऑक्सिडंटमध्ये समृद्ध असतात आणि त्यात बीटा-कॅरोटीन आणि फॉलिक अॅसिड असते, जे डोळ्यांसाठी उत्तम आहे, असे रेड प्रमोशन सेंटरने सांगितले. ते दृष्टी कमी होण्यापासूनही रोखण्यात देखील ते मदत करतात.
मियाझाकी आंब्याच्या निर्यातीपूर्वी कठोर तपासणी आणि चाचणी घेतली जाते. त्यातील उत्तम आंब्यांना “एग ऑफ द सन” म्हणतात. हे आंबे बर्याचदा लाल रंगाचे असतात आणि त्यांचा आकार डायनासोरच्या अंड्यांसारखा दिसतो.