लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

यंदा बहुप्रतीक्षित महाराष्ट्र केसरी स्पर्धा सातारा येथे होणार

-४ ते ९ एप्रिल दरम्यान होणार महाराष्ट्र केसरी स्पर्धा.

पुणे | लोकवार्ता-

यंदा बहुप्रतीक्षित महाराष्ट्र केसरी स्पर्धा सातारा येथे होणार. आज दिनांक १०.०३.२०२२ स्वर्गीय मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रामध्ये पारपडलेल्या कार्यकारणी सभेत पुढील स्पर्धेचे नियोजन करण्यात आले . ६४वी वरिष्ठ गट गादी माती राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी ‘किताब लढत श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे ४ एप्रिल ते ९ एप्रिल रोजी होणार आहे.

तसेच जुनियर व सब जुनियर राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी हि मारुती सावजी लांडगे कुस्ती हॉल भोसरी , पिंपरी चिंचवड येथे १८ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान होणार आहे.

Kushti : Rules & Techniques | Kushti Training & Championship

या कार्यक्रमावेळी कार्यकारणी सभेस कार्याध्यक्ष श्री नामदेवराव मोहिते , उपाध्यक्ष श्री सर्जेराव शिंदे , उपाध्यक्ष श्री गणेश कोहळे उपाध्यक्ष श्री हनुमंत गावडे , उपाध्यक्ष श्री संभाजी वरूटे उपाध्यक्ष श्री दयानंद भक्त सरचिटणीस प्रा . बाळासाहेब लांडगे , खजिनदार श्री सुरेश पाटिल , तांत्रिक सचिव श्री बंकट यादव , विभागीय सचिव श्री सुनील चौधरी , श्री वामनराव गाते , श्री भरत मेकाले , श्री मुर्लीधर टेकुलवार , श्री संपत साळुंखे , श्री शिवाजी धुमाळ , श्री सुभाष घासे , श्री सुभाष ढोणे , श्री विनायक गाढवे , श्री ललित लांडगे उपस्थित होते.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani