“कोरोनाने निधन झालेल्यांच्या कुटुंबियांना महापालिकेचं अर्थसहाय्य”
पिंपरी। लोकवार्ता-
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत कोरोना काळात अनेक्क व्यक्तींचे निधन झाले असून बहुतांश लोकांचा तोंडचा घास गेला आहे. अश्या काळात महापालिकेने अर्थसहाय्य म्हणून २५ हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्याचे ठरवले आहे.परंतु यासाठी ५० वयाची अट घालण्यात आलेली होती .आता हि अट रद्द करण्यात आलेली असून त्यास स्थायी समितीने मंजुरी दिलेली आहे.

कै.मधुकरराव पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक झाली. या दोन्ही बैठकांमधील एकूण ७५ विषयांपैकी ५९ विषय मंजूर करण्यात आले, तर ऐनवेळच्या २३ विषयांनाही मंजुरी देण्यात आली. विकास कामे व इतर ऐनवेळच्या विषयांसह एकूण ३२ कोटी ७५ लाख ५७ हजार ४४१ रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिली.
अध्यक्षस्थानी अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे होते. शहरातील सुमारे पावणेचार हजार नागरिकांची मृत्यू झाला आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्यांना पंचवीस हजारांची मदत देता येते. मात्र, त्यासाठी पत्रास वर्षांवरील नागरिकांसाठी ही मदत होती. त्यामुळे अनेक नागरिक मदतीपासून वंचित राहत होते.परंतु आता हि अट रद्द करण्यात आल्यामुळे कोरोना काळात गमावलेल्या व्यक्त्तींच्या कुटुंबियांना २५ हजारांची मदत मिळणार आहे.