लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन

कोरोनाचे सर्व नियम पाळून महापरिवर्तन दिन करावा साजरा मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन.

पिंपरी । लोकवार्ता-

 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो भीम अनुयायी मुंबईतल्या चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येत असतात. यंदा कोरोनाचे निर्बंध शिथिल असले तरी ओमायक्रॉनचं सावट आहे. त्यामुळे लोकांनी गर्दी करू नये, कोरोनाचे नियम पाळूनच अभिवादन करावं असं आवाहन करण्यात आलंय. अनुयायांना थेट ऑनलाइन दर्शनही घेता येणार आहे. 

महाडच्या चवदार तळ्यावर दलित मित्र खांबे गुरुजी ट्रस्टच्या माध्यमातून अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने महाडच्या चवदार तळे परिसरात मेणबत्या प्रज्वलित करून, अभिवादन करण्यात आलं. महाड आणि परीसरातील शेकडो आंबेडकरी अनुयायी  चवदार तळ्यावर उपस्थित होते.भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या  महापरीनिर्वाण दिनाच्या पूर्व संध्येला मनमाड शहरातील आंबेडकरी जनतेने  कॅण्डल मार्च काढून अभिनव पद्धतीने आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन केले. मनमाड शहर  आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला मानलं जातं. सफेद वस्त्र परिधान करत हातात मेणबत्ती घेवून  बुद्धम शरणम गच्छामीच्या जयघोषात शिस्तबद्ध पद्धतीने हा कॅण्डल मार्च काढला.  विविध पक्ष, संस्था, संघटना तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते  कॅण्डल मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले .

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani