लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

मुंबई पुणे प्रवास आता आणखी सोईस्कर आणि कमी वेळात होणार

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळा ते खोपोली एक्झिट या भागातील पर्यायी रस्त्यासाठी तयार करण्यात येत आहे.

पुणे । लोकवार्ता

मुंबई पुणे हायवे नेहमी ट्रॅफिक जॅम असतो. कित्तेक वेळा अपघात होण्याचे प्रमाण देखील जास्त असते.अनेक नागरिकांना याचा सामना करावा लागत असे. मुंबई पुणे जुना महामार्ग अरुंद व नागमोड्या वळणांचा असल्याने एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी बराच वेळ नागरिकांना लगात होता. तसंच अनेकदा वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे प्रवास सुखकर आणि जलद गतीने प्रवास होण्यासाठी मुंबई पुणे एक्सप्रेस वे तयार करण्यात आला. मुंबई – पुणे एक्स्प्रेस महामार्गावरील अंतर आणखी 25 मिनिटांनी कमी होणार आहे. तब्बल सहा किलोमीटरने हे अंतर कमी होणार असून या दोन शहरातील अंतर कमी करण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळा ते खोपोली एक्झिट या भागातील पर्यायी रस्त्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या एका बोगद्याचे काम डिसेंबर अखेरीस पूर्ण होणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दोन बोगद्यांपैकी एका बोगद्याचे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. डिसेंबर अखेरपर्यंत बोगद्यांचे काम शंभर टक्के पूर्ण करण्याचे लक्ष महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ठेवण्यात आले आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किमी राहिलेल्या मिसिंग लिंकचे काम एमएसआरडीसीकडून सुरु करण्यात आले आहे.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani