ट्रम्प यांचे फेसबुक अकाउंट २ वर्षांसाठी बंद
यूट्यूबनेही घातली बंदी

लोकवार्ता।प्रतिनिधी
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्षडोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुक अकाउंट २ वर्षे बंदच ले आहे. फेसबुकबरोबरच ट्रिटर आणि यूट्यूबनेही ट्रम्प यांच्यावर बंदी घातली आहे.अमेरिकेत कॅपिटॉल हिल भागातील हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याबद्दल ही बंदीची कारवाई करण्यात आली होती. अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ६ जानेवारीला ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटॉल हिल भागात घुसखोरी करून तेथे मोठाच धुडगूस घातला होता. तेथे त्यांची पोलिसांबरोबर चकमकही झाली होती. त्या हिंसाचारात ४ जण ठार झाले होते.

या प्रकाराची सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने गंभीर दखल घेऊन ट्रम्प यांच्यावर बंदी घातली होती. त्यात फेसबुकनेही हा निर्णय घेतला होता.त्यांनी आज त्यांची ही बंदी २ वर्षे कायम राहील असे स्पष्ट केले आहे. फेसबुकचे उपाध्यक्ष निक क्लेग यांनी म्हटले आहे की, त्यांची ही दोन वर्षांची बंदी ७ जानेवारीपासून सुरू झाल्याचे समजण्यात येईल. फेसबुकबरोबरच इन्स्टाग्रामवरील त्यांची बंदीही दोन वर्षे सुरू राहणार आहे.
फेसबुकने सुरुवातीला ट्रम्प यांच्यावरील ही बंदी नेमकी किती काळासाठी आहे हे स्पष्ट केले नव्हते.त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत होती.त्यामुळे फेसबुकच्या संचालक मंडळाने बैठक घेऊन हा बंदीचा कालावधी निश्चित केला आहे .