लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

पक्ष आणि जनतेत विश्वासाचा सेतू व्हा !

पक्ष आणि सामान्य जनता यांच्यात विश्वासाचा दुवा म्हणून काम करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

दिल्ली। लोकवार्ता-

भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष आणि सामान्य जनता यांच्यात विश्वासाचा दुवा म्हणून काम करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधानांनी आगामी विधानसभा निवडणुकीत सामान्य जनतेचा पाठिंबा भाजपला मिळेल, असा विश्वास भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत व्यक्त केला.भाजप हा सेवा, संकल्प आणि समर्पण या मूल्यांवर वाटचाललार्णारा पक्ष आहे ,असे पंतप्रधानांनी भाषणात नमूद केल्याचे पक्षाचे सरचिटणीस आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले. बैठकीत उत्तराखंड, मणिपूर ,उत्तर प्रदेश, तसेच गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत सादरीकरण केले. पंजाब प्रदेश शाखेनेदेखील निवडणुकीसाठी केलेल्या तयारीबाबत माहिती दिल्याचे यादव यांनी नमूद केले.

जनतेला भेडसावणाऱ्या मुद्दय़ांचा भाजपने नेहमीच विचार केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्ष आणि जनता यांच्यात विश्वासाचा सेतू म्हणून काम करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. करोनाकाळातही पक्ष कार्यकर्त्यांनी जनतेची सेवा करण्यावर भर दिल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या भाषणानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ठराव मांडला, त्यात मोदी सरकारच्या विविध उपाययोजनांबद्दल कौतुक करण्यात आले. त्याबाबतच्या ठरावाची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. करोनाकाळात जनतेत विनाकारण भीती निर्माण करण्याच्या विरोधकांच्या संधिसाधू राजकारणाचा ठरावात निषेध करण्यात आल्याचे सीतारामन यांनी नमूद केले. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी तसेच मुरली मनोहर जोशी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani