तृतीयपंथी व्यक्तींना महापालिका दरमहा देणार ३ हजार रुपये
पिंपरी: तृतीयपंथींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने दरमहा पेंशन सुरु केली आहे. महापालिका हद्दीतील वयाची ५० वर्ष पूर्ण झालेल्या तृतीयपंथी रहिवास्यांना आर्थिक मदत म्ह्णून दरमहा ३ हजार रुपये पेंशन स्वरूपात मदत देण्यात येणार आहे.

तृतीयपंथींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने दरमहा पेंशन सुरु केली आहे. महापालिका हद्दीतील वयाची ५० वर्ष पूर्ण झालेल्या तृतीयपंथी रहिवास्यांना आर्थिक मदत म्ह्णून दरमहा ३ हजार रुपये पेंशन स्वरूपात मदत देण्यात येणार आहे.
तृतीयपंथी लोक समाजावर अवलंबून असतात. त्यामुळे समाजाने त्यांच्या संवेदना समजून घेतल्या पाहिजेत. आपले कर्तव्य म्हणून अशा दुर्लक्षित घटकांसाठी आपण सामाजिक जाणिवेतून काम केलं पाहिजे. या समूहाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेने असे ठोस पाऊल उचलले आहे. अशा व्यक्तींना स्वावलंबी बनवण्यासाठी महापालिका विविध योजना आणि उपक्रम राबवत आहे. काही वेळा तृतीयपंथी लोकांना हलाखीचे दिवस काढावे लागतात. अशावेळी त्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करणे गरजेचे असते. म्हणून महापालिकेने पालिकेच्या हद्दीतील आणि ज्यांचे वयवर्षे ५० पूर्ण आहे अशा तृतीयपंथी लोकांसाठी आर्थिक मदत म्हणून दरमहा ३ हजार रुपये देण्यात येणार आहे.
त्यामुळे समाजातील अशा दुर्लक्षित घटकांना आर्थिक स्वावलंबी होऊन समाजातील इतर घटकांप्रमाणे जगता येणार आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेने तृतीयपंथींना मेट्रो आणि PMPML ची सफर घडवली. आता आर्थिक मदत करून या लोकांना समाजातील एक मूलभूत घटक बनवला आहे.