बारावीचा निकाल जाहीर..!यावर्षी देखील मुलींची बाजी..
राज्यात कोकण पहिले तर मुंबईचा निकाल सर्वाधिक कमी.
पुणे । लोकवार्ता-
बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा थोड्याच वेळात संपणार आहे. यावर्षी बारावीचा निकाल 94. 22 टक्के लागला आहे. सर्वात जास्त निकाल कोकण विभागाचा 97.21 टक्के, तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा 90.91 टक्के लागला आहे. राज्याचा निकाल 94.22 टक्के इतका लागला आहे. बोर्डाच्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी परीक्षा आणि निकाल यासंदर्भात माहिती दिली.

दरम्यान, यावर्षीही निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. तर मुलांच्या तुलनेत 2.06 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. फेब्रुवारी-मार्च 2020-21 च्या तुलनेत या वर्षीच्या निकाल 3.56 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये बारावीचा निकाल 99.63 टक्के लागला होता. यंदा निकालात कोकण आणि मुंबई सर्वात जास्त आणि सर्वात कमी अनुक्रमे पाहता येईल.