उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांची निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासा

0Shares
मुंबई : निवडणूक आयोगाने सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची निवडणूक प्रतिज्ञापत्रांची पडताळणी करण्याची विनंती केली आहे.या तिघांनी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार एका माहिती अधिकार (RTI) कार्यकर्त्याने निवडणूक आयोगाकडे केली आहे. यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले आहे
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात दिलेली आपल्या संपत्तीची माहिती चुकीची आहे, अशी तक्रार एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाने या तिघांच्या शपथपत्राची तपासणी करण्यास सीबीडीटीला सांगितले आहे. १६ जूनला शपथपत्राबाबत निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एखाद्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास किंवा त्याबाबत तक्रार आल्यास निवडणूक आयोग त्याची दखल घेईल, असे आयोगाने त्यावेळी म्हटले होते. त्यानुसार आरटीआय कार्यकर्त्याने या तिघांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे महिनाभरापूर्वी तक्रार केली होती. त्यानंतर त्याने आयोगाला स्मरणपत्रही पाठवले होते. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले आहे.
जून महिन्यांत निवडणूक आयोगाने खोट्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांबाबत आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर याबाबत घडामोडी सुरू झाल्या. १६ जून रोजी आयोगाने घोषणा केली होती की, “ज्या उमेदवारांविरोधात प्रतिज्ञापत्रांमध्ये चुकीची माहिती दिल्याच्या तक्रारी येतील त्यांची निवडणूक आयोगाकडून दखल घेतली जाईल.”