पुण्यातील शिवसैनिकाने स्वतःच्या रक्ताने रेखाटले उद्धव ठाकरेंचे चित्र
लोकवार्ता : पुण्यातील शिवसैनिकाने स्वतःच्या रक्ताने रेखाटले उद्धव ठाकरेंचे चित्र आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा बुधवारी वाढदिवस होता.

आपल्याला वाढदिवसानिमित्त कुणीही भेटवस्तू देऊ नये. वाढदिवसानिमित्त मला भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ नको तर प्रतिज्ञापत्र द्या असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं होतं. त्यांच्या या वाढदिवसावर राज्यातील सत्तांतराचा देखील सावट होतं. त्यामुळे राज्यभरातील शिवसैनिक भावूक झाले होते. अनेक शिवसैनिकांनी त्यांना प्रतिज्ञापत्र देखील पाठवले. मात्र पुण्यातील एका शिवसैनिकाने उद्धव ठाकरे यांच्या प्रति आपली निष्ठा वेगळ्या प्रकारे दाखवली. या तरुणाने चक्क स्वतःच्या रक्ताने उद्धव ठाकरे यांचं पोट्रेट तयार केलं आहे.
असून आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी स्वतःच्या रक्ताने आणि स्वतःच्या हाताने उद्धव ठाकरे यांचं एक छायाचित्र रेखाटलं. ती छायाचित्र वाढदिवसाच्या दिनी उद्धव ठाकरेंना देऊन त्यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या. सारंग धारणे यांनी दिलेल्या अनोख्या शुभेच्छेची खरंतर बुधवारी पुण्यात दिवसभर चर्चा होती.