लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

आमदार उमा खापरे यांचं जल्लोषात स्वागत; आमदार महेश लांडगे यांनी ‘याबाबत’ केल्या भावना व्यक्त…

लोकवार्ता: राष्ट्र प्रथम… नंतर पक्ष आणि शेवटी आपण… या भावनेतून काम करणाऱ्या भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांसाठी उमाताई खापरे यांचा विजय प्रेरणादायी ठरला आहे. आमदार लक्ष्मण जगताप आजारी असतानासुद्धा राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत मतदान करुन पक्षनिष्ठेचा आदर्श घालून दिला, हीच भाजपाची खरी ताकद आहे, अशा भावना भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.

विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आमदार उमा खापरे यांचे पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले. त्यांनतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांची भक्ती-शक्ती चौक ते मोरवाडी येथील पक्षकार्यालय पर्यंत भव्य रॅली काढली गेली.
आमदार लांडगे म्हणाले की, राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप आग्रह करुन आहे. त्यांच्या पक्षनिष्ठेबाबत राज्यभरात चर्चा झाली. उमा खापरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचे काम केले. त्यांना पक्षनिष्ठेचे फळ मिळाले. हा विजय आणि संधी भाजपाच्या प्रत्यक कार्यकर्त्यासाठी मार्गदर्शक आहे. प्रामाणिकपणे काम केल्या पक्षनेतृत्व संधी देते ही बाब लक्षात घेतली पाहिजे… तसेच, उमा खापरे यांच्या रुपाने पिंपरी-चिंचवडला पहिल्या महिला आमदार मिळाल्या. त्यासाठी राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सर्व पक्ष्ेष्ठींचे आभार मानतो, असेही आमदार लांडगे यावेळी म्हणाले.

याप्रसंगी माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, प्रदेश सचिव अमित गोरखे, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, माजी महापौर केशव घोळवे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, विजय फुगे, प्रदेश निमंत्रित सदस्य संतोष कलाटे, दक्षिण भारतीय.आघाडीचे प्रदेश प्रमुख राजेश पिल्ले, महिला शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे, भाजपा महिला मोर्चा कोषाध्यक्षा शैलजा मोळक, माउली थोरात, वैशाली खाडे, रेखा कडाली, आशा काळे, शोभा भराडे, कैलास सानप, प्रदीप बेंद्रे, राणी कौर, तेजस्विनी कदम यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani