स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’चे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार!
-भारताचे गृहमंत्री अमित शाह यांचा पुणे दौरा.
-भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांचे कौतुक.
पिंपरी।लोकवार्ता-
हिंदुभूषण छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पुतळा अर्थात ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ पिंपरी-चिंचवड मोशी येथे साकारण्यात येत आहे . या शंभूसृष्टीचे अनावरण करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अनुमती दिली आहे. तसेच, बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होण्याबाबत केलेल्या न्यायालयीन लढ्यात यशस्वी झाल्याबद्दल महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींचेही अभिनंदन केले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबॉरेटरी येथे पिंपरी-चिंचवड भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर हिरानानी घुले, भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे, माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारुढ पक्षनेते हिरानानी घुले, संघटन सरचिटणीस अमोल थोरात आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार महेश लांडगे व त्यांच्या समवेत सर्व सहकारी व पदाधिकारी यांनी देशाचे माननीय गृहमंत्री अमितजी शाह यांची आज पुणे येथे चंद्रकांतजी पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली सदिच्छा भेट घेतली! छत्रपती संभाजी महाराज यांचा मोशी येथे उभारत असलेल्या देशातील सर्वात उंच पुतळ्याची #StatueOfHindubhushan प्रतिकृती भेट देण्यात आली.