“केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा पुणे दौरा”
-अमित शाह आज पुण्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
पुणे।लोकवार्ता-
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज अमित शाह पुण्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. पुणे महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला देखील ते उपस्थित राहतील, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

अमित शाह आज पुण्यात असून ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेतील. त्यानंतर पुणे CFSL कॅम्पस येथे नवीन इमारमतीचं उद्घाटन करतील. अमित शाह यांचा दुपारी NDRF जवानांसोबत स्नेह भोजनाचा कार्यक्रम असेल. AMNICOM संस्थेच्या दीक्षांत समारंभाला ते उपस्थित लावतील. यानंतर सांयकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पायाभरणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं लोकार्पण अमित शाह यांच्या हस्ते करण्यात येईल.महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं भाजप पुणे शहर कार्यकर्ता संमेलनात ते मार्गदर्शन करतील. अमित शाह या कार्यक्रमानंतर दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करतील.