जगद्गुरू संत तुकाराम महाराज शिळा मंदिराची केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली पाहणी
-१४ जून ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिळा मंदिराचे उदघाटन.
देहू । लोकवार्ता
जगद्गुरू संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे उदघाटन १४ जून रोजी पंप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी सर्व तय्यारी करण्यात आली आहे.संत तुकाराम महाराज संस्थानने बांधलेल्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जूनला देहूत येत आहेत. या सोहळ्यात ते संवाद सभेच्या माध्यमातून वारकऱ्यांशी संवाद साधणार आहे. यामुळे एक नवीन आध्यात्मिक संदेश समाजामध्ये जाईल,’’ असे प्रतिपादन भाजपचे नेते यांनी येथे केले. संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने बांधलेल्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथे होणार आहे. त्यानंतर माळवाडी येथील भव्य पटांगणात संवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या संवाद सभेच्या ठिकाणी आणि देहूतील देऊळवाड्यात प्रकाश जावडेकर यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, अभिजित महाराज मोरे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आचार्य तुषार भोसले, राजेश टिळेकर, गणेश भेगडे, विशाल खंडेलवाल, राहुल बालघरे, पोलिस निरीक्षक वर्षाराणी पाटील, वाहतूक पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे व इतर उपस्थित होते.