लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

इंधन दरवाढीबद्दल केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं कारण…

दीड महिन्यात तेल कंपन्यांनी २५ वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले

लोकवार्ता।प्रतिनिधी

देशात सध्या इंधनाचे भाव गगनाला भिडलेले आहेत. कोरोनामुळे हैराण झालेले नागरिक या इंधनदरवाढीमुळे अधिकच संकटात सापडले आहेत. अशातच आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी या भाववाढीबद्दलचा खुलासा केला आहे. जनकल्याणाच्या योजनांमुळे इंधनाचे भाव वाढलेत, असं त्यांचं म्हणणं आहे.

http://silversakshi.in/
http://silversakshi.in/

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने तसंच केंद्रीय आणि राज्यांच्या करांमुळे इंधनाचे दर वाढले आहेत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंधन दरवाढीबद्दल अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दरवाढीचं नवं कारण दिलं आहे.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मला मान्य आहे की, इंधन दरवाढीमुळे जनसामान्यांचे हाल होत आहेत. पण एका वर्षात करोना प्रतिबंधक लसीच्या मात्रांवर ३५ हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे. गरीबांना आठ महिन्यांचा किराणा मोफत देण्यासाठीच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेवर एक लाख कोटी रुपये खर्च झाले. शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये काही रक्कम पाठवण्यात आली. तसंच तांदूळ आणि गव्हाच्या MSP ची घोषणा करण्यात आली. त्याशिवाय देशात रोजगारासाठी, विकासकामांसाठी पैशांची गरज आहेच. अशावेळी आम्ही पैसे वाचवून ते पैसे लोककल्याणासाठी वापरत आहोत.

राहुल गांधींनी इंधन दरवाढीवर केलेल्या टीकेबद्दल जेव्हा प्रधान यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ते म्हणाले, जर राहुल गांधींना गरीबांची एवढीच काळजी वाटते, तर त्यांनी काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या राज्यातल्या इंधनांचे दर कमी करण्यास सांगावे.

गेल्या दीड महिन्यात तेल कंपन्यांनी २५ वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. देशात पेट्रोल ६.२६ रुपयांनी तर डिझेल ६.६८ रुपयांनी वाढलं आहे.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani