लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

तळेगाव दाभाडे येथे सीआरपीएफ तर्फे महिला दिनानिमित्त अनोखा उपक्रम

-शाळेतील मुलींना एक वर्षाचे सॅनिटरी नॅपकिन वाटप.

तळेगाव। लोकवार्ता-

महिला दिवस निमित्त  हेंकेल  अधेसिव टेक्नोलॉजीस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ( हेंकेल   इंडिया) ने , केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) व व्ही२ केअर एचएसडब्लू फाउंडेशन आणि एनजीओच्या सहकार्याने, तळेगाव दाभाडे येथे कमी  सुविधा असलेल्या शाळांसाठी मासिक पाळी स्वच्छता जागरूकता चालविले असून  आणि संपूर्ण वर्षभर पुरेल एवढे असे १ लाख  सॅनिटरी नॅपकिन वाटप करण्यांत आले. याप्रसंगी  श्वेता बापट – (HOD  चीफ  गेस्ट), भूपेश सिंह –  (दक्षिण आशिया हेड हेंकल टेक्नॉलॉजी) ,  संध्या केडलया – (कॉर्पोरेट हेड हँकेल इंडिया ), प्रसाद खंडागळे – (पुणे हेड हँकेल इंडिया), .पद्मजा झा – (जनरल सेक्रेटरी,  V2 केयर HSW, फाऊंडेशन ), डॉ. ए.  राधा (सीआरपीएफ पुणे),  D. L गोला (DIGP range CRPF) आदी उपस्थित होते . 

हेंकेल इंडियाचे सीएसआर कमिटी मेंबर भूपेश सिंग म्हणाले, स्त्रिया या आपल्या समाजाचा कणा आहेत आणि त्यांचे आरोग्य  हे सर्वात महत्त्वाचे आहे. या उपक्रमाद्वारे आम्ही किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढवत आहोत. कमी सुविधा असलेल्या भागातील किशोरवयीन मुलींनी उच्च दर्जाचे सॅनिटरी नॅपकिन वापरावे ,सॅनिटरी नॅपकिन्सची सुरक्षित विल्हेवाट लावाली यासाठी आम्ही कार्य करत आहोत. पर्यावरणाच्या अनुकूलतेसाठी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानास पाठिंबा देणे हा आमचा उद्देश आहे. 

हेंकेल द्वारे आम्हाला असे जाणवले की मासिक पाळीविषयी माहिती नसणे, स्वच्छताविषयक उत्पादनांचा आभाव आणि शाळेतील गैर-सोयीचे वातावरण यामुळे मुलींना शाळेत जाणे कठीण होऊ शकते. आमच्या मासिक पाळी स्वच्छता जागरुकता आणि सॅनिटरी नॅपकिन वितरण कार्यक्रमाद्वारे आम्ही  याविषयी जागरूकता निर्माण करू. याचबरोबर शाळांमधील मासिक पाळीशी संबंधित आव्हानांना तोंड देण्याचा प्रयत्न केला आहे. या तरुण मुलींना मासिक पाळी आणि त्याची बेसीक बायोलॉजी अधिक चांगल्या प्रकारे समजून देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.  मासिक पाळीबद्दल सामान्यत: प्रचलित समज – गैरसमज दूर करण्यावर आमचा भर आहे. स्त्रियांना स्वच्छतेच्या पद्धतींचा अवलंब करण्यास मदत करणे हे आमचे ध्येय आहे जेणेकरूण त्यांचे आरोग्य सुधारेल  आणि मासिक पाळी बद्दलच्या समजातील धारणेस बदलता येईल. 

मासिक पाळीच्या समस्यांमुळे मुली शाळा सोडतात या  समस्येचे निराकरण करण्यासाठी हेंकेल तर्फे आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही गुवाहटीमध्ये याआधीही असाच एक कार्यक्रम आयोजित केला होता.  आणि आता इंदौर, अहमदाबाद आणि कानपूरमध्ये मासिक पाळी संबंधित शैक्षणिक आणि सहाय्यक उपक्रम राबवत आहोत. प्रत्येक केंद्रातील किमान १५००- २००० मुलींच्या जीवनात बदल घडवुण आणण्यासाठी पाठिंबा देणे आमचे ध्येय आहे.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani