भोसरीतील लहानग्या पहिलवानाचा अनोखा विक्रम
एका दमात मारल्या १००० जोर.
भोसरी । लोकवार्ता-
पिंपरी चिंचवड मधील भोसरी हे गाव औद्योगिक आणि क्रीडा या क्षेत्रात अग्रेसर आहे. लहान पनापासूनच येथील पालक त्यांच्या मुलांना क्रीडा क्षेत्रात जाण्यास प्रोत्साहन देत असतात.भोसरीला साथ लाभलेली आहे ती कुस्ती या खेळाची.येथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना फक्त कुस्तीची आवड आहे. अश्यातच काल रविवार दि. २२/०३/२०२२ रोजी भोसरीतील लहानग्या पैलवानाने एक अनोखा विक्रम केला आहे.या लहानग्या पहिलवानाचे नाव स्वराज राहुल लांडगे असे आहे.या पहिलवानाने एकाच दमात तब्बल १००० जोर मारून नवीन अनोखा विक्रम केला आहे.या विक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हा अनोखा विक्रम पाहण्यासाठी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे हे स्वतः येथे उपस्थित होते. स्वराज याच क्रीडा क्षेत्रात नवनवीन विक्रम करण्याचे स्वप्न आहे.तसेच या सर्व कामात त्याचे वडील, गुरु,मामा या सर्वांची त्याला साथ असते.
हा विक्रम पाहण्यासाठी भोसरीकरानी चांगलीच उपस्थिती लावली होती.
आमदार महेश लांडगे यांच्या कडून भरभरून कौतुक
भोसरीच्या मातीत वाढलेला हा लहानग्या पठ्ठया पुढे जाऊन पूर्ण देशाचं नाव लौकिक करणार असे आमदार महेश लांडगे या वेळी म्हणाले.