“पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आठही प्रभाग अध्यक्ष्यांची बिनविरोध निवड”
विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज दाखल केले नाहीत. त्यामुळे भाजपाच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.
पिंपरी। लोकवार्ता-
सत्ताधारी भाजपाकडून ‘अ’ प्रभाग अध्यक्ष पदासाठी शैलेश मोरे, ‘ब’ सुरेश भोईर, ‘क’ राजेंद्र लांडगे, ‘ड’ सागर अंगोळकर, ‘इ’ विकास डोळस, ‘ग’ अभिषेक बारणे, ‘ह’ अंबरनाथ कांबळे यांचे एकमेव अर्ज आले होते. अर्ज बाद होऊ नये यासाठी या सर्वांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यांच्या निवडीवर शुक्रवारी अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झाले. तर, ‘फ’ प्रभागात भाजपामध्ये बंडखोरी झाली होती. पण, ऐनवेळी आमदार महेश लांडगे यांनी निवडणुकीत लक्ष घातले आणि आश्विनी बोबडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न केले. त्याला यश मिळाले आणि कुंदन गायकवाड यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी प्रभाग समिती अध्यक्षपदी नगरसेवक कुंदन गायकवाड यांची बिनविरोध निवड करुन घेतल्यामुळे शहरात भाजपाची पकड पुन्हा एकदा मजबूत झाली आहे. पिंपरी-चिंचवडच्या सात प्रभागाच्या अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध झाली. केवळ सत्ताधारी भाजपच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. परंतु, ‘फ’ प्रभागात भाजपा नगरसेविका आश्विनी बोबडे यांनी बंडखोरी केली होती. महापालिकेच्या आठ प्रभाग समित्या आहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अध्यक्षपदासाठी शुकवारी निवडणूक झाली. त्यासाठी सोमवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. या मुदतीत केवळ भाजपाच्या उमेदवारांचे अर्ज आले. विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज दाखल केले नाहीत. त्यामुळे भाजपाच्या उमेदवारांची बिनविरोध झाली.