देशात आज पासून सावरकर गौरव यात्रा
लोकवार्ता : देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे राज्यभरात ३० मार्च ते ६ एप्रिल याकाळात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे.

या यात्रेद्वारे नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातून याची सुरूवात होणार आहे. राज्य सरकारकडून याची घोषणा करण्यात आली आहे.
राहुल गांधी व काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अवमान केला जात आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसबरोबरची युती उद्धव ठाकरे यांनी तोडून दाखवावीच, असं आवाहन आमदार अॅड निरंजन डावखरे यांनी दिलं.
‘सावरकर गौरव यात्रा’ ठाणे शहरातील सर्व भागात जाणार आहे, असं भाजपाचे आमदार संजय केळकर व शिवसेनेचे राज्य समन्वयक नरेश मस्के यांनी सांगितले आहे.