उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिम्मित संतोष बारणे यांच्या वतीने भव्य राज्यस्तरीय सर्व जातीय वधू वर मेळावा
लोकवार्ता : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिम्मित संतोष बारणे यांच्या वतीने भव्य राज्यस्तरीय सर्व जातीय वधू वर मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

आज हा मेळावा मोशी येथील पुणे-नाशिक महामार्गावरील साधुराम मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे. सकाळी १० वाजता मेळाव्याची सुरवात झाली आहे.
याबाबत माहिती देताना संतोष बारणे म्हणाले, मेळाव्यात सहभागी नागरिकांना आगामी संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या पुढील मेळाव्यांना मागील मेळाव्याचे टोकन दाखवून मोफत प्रवेश मिळणार आहे. पुढील एका वर्षाच्या मेळाव्यासाठी कोणतीही फी भरायची आवश्यकता नसणार आहे. मेळाव्यात सहभागी मुला-मुलींच्या परिचय पत्रिकेसाठी प्ले स्टोअरवरून सूत्र बंधन अँप डाउनलोड करावे लागणार आहे. मेळाव्यात मुलींना मोफत प्रवेश असून मेळाव्यातच गरीब मुलींचे मोफत लग्नही लावून दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी 9022595351, 9657499552 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक संतोष बारणे यांनी केले आहे.