वंदना आल्हाट यांच्या वतीने मोशी येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन.
कार्तिकी गायकवाड,प्रसिद्ध गायक कौस्तुभ गायकवाड,पंडितजी कल्याणजी गायकवाड यांचा स्वरानुभूती मराठी हिंदी गाण्यांचा अभूतपूर्व अश्या दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मोशी। लोकवार्ता
मोशी येथील सामाजिक कार्यकर्त्या वंदना आल्हाट व हिरामण आल्हाट यांच्या मोशी भागातील नागरिकांसाठी दिवाळी पहाट चे आयोजन करण्यात आले आहे.गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांना दिवाळी सन साजरा करता आला नाही. मात्र या वर्षी दीपावलीचे औचित्य साधून वंदना आल्हाट यांच्या वतीने महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड,प्रसिद्ध गायक कौस्तुभ गायकवाड,पंडितजी कल्याणजी गायकवाड यांचा स्वरानुभूती मराठी हिंदी गाण्यांचा अभूतपूर्व अश्या दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

बुधवार दिनांक ३/११/२०२० रोजी पहाटे ५ वाजता नवीन मोशी आळंदी रोड जय गणेश लॉन्स शेजारी सेन्ट्रल प्राईड येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे . भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे व शिवांजली महिला सखी मंचच्या अध्यक्षा पुजा लांडगे यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचे उद्धघाटन होणार असल्याचे वंदना आल्हाट यांनी सांगितले आहे.