उंच माझा झोका संस्थेच्या अध्यक्षा वंदना हिरामण आल्हाट यांना प्रतिष्ठेचा नवदुर्गा पुरस्कार जाहीर
मोशीच्या वंदना हिरामण आल्हाट यांना प्रतिष्ठेचा नवदुर्गा पुरस्कार जाहीर
मोशी : येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा उंच माझा झोका संस्थेच्या अध्यक्षा वंदना हिरामण आल्हाट यांना इंद्रायणी सोशल फाउंडेशन वतीने यंदाचा प्रतिष्ठेचा नवदुर्गा पुरस्कार जाहीर झाला आहे.

सौ.वंदना आल्हाट या नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर असतात,उंच माझा झोका या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक होतकरू महीलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.तसेच त्यांनी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजोपयोगी कामे केली आहे.त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांना नवदुर्गा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे असे इंद्रायणी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा अनिता डफळ यांनी सांगितले आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सौ.आल्हाट विविध क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदानाचा वर्षाव होत आहे.