विकास साने फाउंडेशनतर्फे अनाथ आश्रमास वाहन भेट
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाहन सुपूर्द करण्यात आले

लोकवार्ता । प्रतिनिधी
चिखली : अनाथ मुलांनाही सर्व गोष्टींचा आनंद घेता यावा या उद्देशाने ‘विकास साने सोशल फाउंडेशनच्या वतीने चिखलीतील विकास अनाथ आश्रमास चाकी वाहन भेट देण्यात आले. त्यामुळे अनाथालयातील मुलांना शाळेत ये-जा करण्याबरोबरच सहलीचा आनंद लुटता येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकतेच वाहन सुपूर्द करण्यात आले.
फाउंडेशनच्या माध्यमातून अनाथालयचे संचालक माऊली हरकळ आणि विकास साने यांनी दहा वर्षापूर्वी अनाथाश्रमाची स्थापना केली. मराठवाडा, विदर्भ आदी भागातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांबरोबरच इतर अनाथ मुलांच्या राहण्याची आणि शिक्षणाची सोय ते करत आहेत. त्याचबरोबर स्वखर्चाने अनाथालयातील मुला-मुलींची लग्न लावून देण्याची जबाबदारी साने यांनी घेतली आहे. अनाथालयात राहतो म्हणून आपण काहीतरी वेगळे आहोत. इतरांपेक्षा गरीब आहोत, आपल्याला सर्व गोष्टींचा आनंद घेणे आपल्या नशिबी नाही असे अनाथालयाती मुलांना वाटू अशी भावना फाउंडेशनची आहे.
याबाबत विकास साने म्हणाले, “माऊली हरकळ आणि आम्ही अनाथालयातील मुलांना जास्तीत जास्त सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहोत. त्यांना सर्वसामान्य मुलांप्रमाणे प्रमाणे सर्व सुखसोयी उपभोक्ता याव्यात यादृष्टीने वाहन भेट देण्यात आले आहे.”