“विकास डोळस यांची ई प्रभाग अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड.”
दिघी विकास मंचातर्फे ई प्रभाग अध्यक्ष विकास डोळस यांचा सत्कार करण्यात आला आहे.
दिघी। लोकवार्ता-
दिघी मंचातर्फे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘इ’ प्रभाग अध्यक्षपदी दुस-यांदा निवड झाल्यानिमित्त नगरसेवक विकास डोळस यांचा (शनिवारी) सत्कार करण्यात आला.
मंचाचे संस्थापक, मराठवाडा विकास संस्थेचे अध्यक्ष प्रकाश इंगोले, धनाजी कोडजे, संदीप पंडीत, जयराम लिमशे, ओम साई स्कुलचे पांडुरंग म्हेत्रे, रमेश विरनक, बाळासाहेब सुपे,संस्थापक सुनील काकडे, मार्गदर्शक के के जगताप, पांडुरंग म्हेत्रे, खजिनदार दत्ता घुले, सतीश खरात रज्जाक पठाण, कुंडलिक आदक, दिव्या शिक्षण संस्थेचे संचालक इंद्रजीत भोसले, कुंडलिक आदक सलीम शेख, कुमार लोमटे आदी उपस्थित होते.

दिपी-बोपखलेचे प्रतिनिधित्व करत असताना विकास डोळस यांनी मागील साडेचार वर्षात विकासकांमाना प्राधान्यं दिल. ‘इ’ प्रभाग अध्यक्षपदाच्या माध्यमातून या भागातील विकास कामांना गती दिली. त्याची प्रभाग अध्यक्षपदी दुस-यांदा निवड झाल्यानिमित्त मंचातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला असुन आम्हाला त्यांच्या कामाचा अभिमान आहे असे संस्थापक सुनील काकडे यांनी सांगितले.
“दिघी भागातील नागरिकांनी करत असलेल्या कामाबाबत सत्कार करून कौतुकाची थाप दिली. त्यामुळे काम करण्यास उत्साह वाढतो. दिघी विकास मंचाच्या सर्व सदस्य, मार्गदर्शकांचे मी मनापासून आभार मानतो”, असे ‘इ’ प्रभाग अध्यक्ष विकास डोळस सत्काराला उत्तर देताना म्हणाले.