लोकांना शहाणं करून सोडण्यासाठी पत्रकारिता निर्माण झाली – जेष्ठ रंगकर्मी विक्रम गोखले
लोकवार्ता: पत्रकारिता आणि राजकारण समाजाधिष्ठीत असावे. आदर्श पत्रकारीतेच्या जवळ जाणारी अनेक माणसं होऊन गेली. परंतु सध्याच्या तरुण पत्रकार पिढीचा अभ्यास नाही आणि पत्रकारीतेत अभ्यासाला पर्याय नाही. लोकांना शहाणं करून सोडण्यासाठी पत्रकारिता निर्माण झाली आहे… त्यामुळेच लोकशाहीचा चौथा खांब म्हणून पत्रकारिता ओळखली जाते. वार्तांकन करताना समोरील सह्यपरिस्थिती सांगावी. तुम्हाला काय वाटते हे सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही अडचणीत येऊ शकता अशी परिस्थिती सध्या आहे. विशिष्ट राजकीय विचाराला वाहून घेतलेले एक वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिनी यांच्या नादी किती लागायचं आणि आपला कणा ताठ ठेवायचा का नाही हे ठरवण्याची वेळ पत्रकारितेत आली आहे असे प्रतिपादन जेष्ठ रंगकर्मी विक्रम गोखले यांनी पिंपरी येथे केले…

मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व सोशल मीडिया परिषद आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त व॒ महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांना विक्रम गोखले यांच्या हस्ते “जीवनगौरव पुरस्कार” देवून सन्मानित करण्यात आले.
शनिवारी पिंपरीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश. पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रसाद काथे, एंड. असीम सरोदे, पुरस्कारार्थी एस. एम. देशमुख, शोभना देशमुख, पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, सोशल मीडियाचे अध्यक्ष सुरज साळे, ज्येष्ठ सल्लागार अरुण उर्फ नाना कांबळे, बाळासाहेब ढसाळ, पुणे जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर, ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी, डि. के. वळसे, शरद पाबळे, रोहित खर्गे, सुनील जगताप, सुनील लोणकर, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रवीण शिर्के, सरचिटणीस मारुती बानेवार, प्रशांत साळुंखे, छायाचित्रकार मार्गदर्शक देवदत्त कशाळीकर, व्हिडीओग्राफर मार्गदर्शक गुरुदास भोंडवे, आदी उपस्थित होते.