लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

युवा सेनेतर्फे बालदिनानिमित्त रविवारी थेरगावात बालजत्रा, मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन

पिंपरी। लोकवार्ता-

पिंपरी-चिंचवड  शहर युवा सेना व विश्वजीत बारणे यांच्या सहकार्यातून बालदिनानिमित्त उद्या (रविवारी) बालजत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये खाऊगल्लीचे विशेष आकर्षण असून मनोरंजनाचे विविध कार्यक्रम सुद्धा घेतले जाणार आहेत, अशी माहिती शहर युवासेना प्रमुख विश्वजीत बारणे यांनी दिली. 

थेरगावातील पद्मजी पेपर मिल शेजारी रविवारी दुपारी 4 ते रात्री 10 या वेळेत बालजत्रा भरणार आहे. शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या हस्ते बालजत्रेचे उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर दिवाळिनिमित्त सम्राट मित्र मंडळातर्फे घेण्यात आलेल्या भव्य गडकिल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे. 

युवासेना प्रमुख विश्वजीत बारणे म्हणाले की,  ”भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांचा जन्म दिवस 14 नोव्हेंबर  हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त दिवाळीच्या सुट्टीमध्ये मुलांना आनंद लुटण्यासाठी बालजत्रेचे आयोजन केले आहे. लहान मुलांसाठी खाऊगल्ली, मनोरजंनाचे कार्यक्रम होणार आहेत. थेरगाव परिसरातील पालक, बालकांनी जत्रेत सहभागी व्हावे. जत्रेचा आनंद घ्यावा” असे आवाहन बारणे यांनी केले.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani