मालमत्ताकर न भरल्यामुळे सोसायट्यांचे पाण्याचे कनेक्शन कट; आमदार महेशदादा लांडगे यावर त्वरित काढला तोडगा
लोकवार्ता : पिंपरी चिंचवड मनपाच्या करसंकलन विभागाने आज चिखली येथील साई श्रद्धापार्क व ऐश्वर्यम कोटयार्ड या दोन सोसायट्यांमधील काही सदस्यांनी मालमत्ताकर न भरल्यामुळे या दोनी सोसायट्यांचे पाण्याचे कनेक्शन कट केले. याला चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनने तिव्र विरोध केला.

फेडरेशन मार्फत फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी पिंपरी चिंचवड मनपाच्या करसंकलन विभागाचे उपायुक्त निलेश देशमूख यांच्याशी संपर्क साधल्यावर देशमुख यांनी पिंपरी चिंचवड मनपाचे अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी असे आदेश दिल्याचे सांगितले. यावर सांगळे यांनी सदर बाब भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांना सांगितल्यावर महेशदादा लांडगे यांनी पिंपरी चिंचवड प्रशासनास बोलून ही चुकीची मोहीम तात्काळ थांबवण्याच्या सूचना दिल्या व ही मोहीम थांबवली गेली. महेशदादा लांडगे यांनी ही चुकीची मोहीम लगेच थांबवल्याबद्दल सोसायटीधारकांनी लांडगे यांचे आभार व्यक्त केले….
एकतर पिंपरी चिंचवड मनपाकडून आमच्या सोसायट्यांना पुरेसे पाणी पुरवले जात नाही, चांगले रस्ते नाहीत, वेळेवर कचरा उचलला जात नाही. त्यात आता सोसायटीमधील काही सदस्यांनी मालमत्ताकर भरला नाही म्हणून पूर्ण सोसायटीचा पाणी पुरवठा बंद करणे एकदम चुकीचे आहे. पिंपरी चिंचवड शहरात अनेक नोंदी नसलेल्या मालमत्ता आहेत, बेकायदशीर बांधकामे चालू आहेत याकडे आयुक्तांनी लक्ष दिले तर शहराच्या विकासात मदत होईल…
– संजीवन सांगळे