लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

“पिंपरी चिंचवड मध्ये येत्या गुरुवार-शुक्रवार पाणीपुरवठा बंद”

-गुरुवारी सकाळी पाणीपुरवठा केल्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे सायंकाळाचा पाणी पुरवठा होणार नाही.

पिंपरी | लोकवार्ता-

येत्या गुरुवारी सायंकाळी पिंपरी चिंचवड मध्ये पाणी पुरवठा बंद राहील. रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी पाणी पुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरवासियांना आवश्यक तितके पाणी भरुन ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी पाणीपुरवठा केल्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे सायंकाळाचा पाणी पुरवठा होणार नाही. तर, शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याचेही पिंपरी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कळवले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

पाणी पुरवठ्यावर कधी परिणाम?

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे, सेक्टर क्र.23 निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्र विद्युत पुरवठा विषयक व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करणे. शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक आहे. त्यासाठी गुरुवारी (दि.10) शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani