इंद्रायणी, पवना, मुळा नदीपात्रात जलपर्णीची वाढ; चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने जलपर्णी काढण्याचे आवाहन
लोकवार्ता : शहरातील इंद्रायणी, पवना, आणि मुळा या नद्यांच्या पात्रातील जलपर्णी मोठ्याप्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात नदी प्रदूषण वाढत आहे. विविध कंपन्यांचे केमिकल मिश्रीत पाणी या नदीमध्ये सोडण्यात येत आहे. या कंपन्यांवर तात्काळ कारवाई करावी, असं आवाहन चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी, पवना व मुळा या नद्यांच्या पात्राणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढलेली आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होत आहे. तसेच नुकतेच पुणे शहरात झिका या डासांपासून होणाऱ्या भयंकर आजाराचे शहरात रुग्ण सापडले आहेत. झिका हा आजार स्वछ साठलेल्या पाण्यात पैदास होणाऱ्या एडिस इजिप्ती या डासाच्या चावल्याने होणारा आजार आहे. आणि या डासाची पैदास प्रामुख्याने या जलपर्णी असणाऱ्या नदी प्रवाहात होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा विषय असल्याने या तिन्ही नद्यांमधील जलपर्णी ताबडतोब काढावी अशी विनंती या फेडरेशच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
तसेच या तिनी नद्यांच्या आजूबाजूच्या कंपन्या व कारखान्यांमधून निर्माण होणारे केमिकलयुक्त पाणी या नद्यांच्या पात्रात सोडले जाते. त्यामुळे या नद्यांचे खूप मोठ्या प्रमाणात पाणी प्रदूषित होत आहे. तरी संबंधित कंपन्या व कारखाने यांच्यावर कारवाई करावी आणि हे पाणी सोडणे बंद करण्यास सांगावे, असं आवाहन सोसायटी फेडरेशच्या वतीने पिंपरी चिंचवड आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे करण्यात आले आहे.