आम्हीही मेलेल्या आईचे दूध प्यायलो नाही
चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादीला प्रतिइशारा

लोकवार्ता । प्रतिनिधी
भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापुरी हिसका दाखविण्याची भाषा करणाऱ्यांनी आम्हीही मेलेल्या आईचे दूध प्यायलो नाही, हे लक्षात ठेवावे, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला.
किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या आरोपावरून भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.
सोमय्या यांनी थेट कोल्हापुरात येण्याचे आव्हान देत दौरा जाहीर केला आहे. या दौन्याच्या पार्श्वभूम शीवर राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी सोमय्या यांना ‘कोल्हापुरी हिसका दाखवू,’ असा इशारा दिला आहे. या राष्ट्रवादी काँग्रेसच्या इशाऱ्यानंतर आ. चंद्रकांत पाटील यांनी ‘आम्हीही मेलेल्या आईचे दूध प्यायलो नाही,’ असे सांगत त्यांना प्रतिइशारा दिला आहे.