आम्ही छत्रपती संभाजी राज्यांसोबत; पुण्यातील कार्यकर्त्यांचा राज्यांना पाठिंबा
शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगगडावर जाण्यासाठी रवाना.
पुणे । लोकवार्ता
संभाजीराजेंवर अन्याय झाला आहे .आम्ही नेहमीच राज्यांच्या सोबत असणार अशी भूमिका पुण्यातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.6 जूनच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी पुण्यातून कार्यकर्ते रायगडला निघाले आहेत. उद्या रायगडावर राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थनार्थ हे कार्यकर्ते रवाना होत आहेत. संभाजीराजे छत्रपती जी कोणती भूमिका घेतील ती आमची भूमिका असेल, संभाजीराजेंवर अन्याय झाला आहे. त्यांना खासदारकी मिळायला हवी, आम्ही संभाजीराजेंसोबत आहोत, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना करत आपण राज्यसभेसाठी अपक्ष उभे राहणार असल्याचे जाहीर केले होते. सर्व पक्षांनी पाठिंबा देऊन राज्यसभेवर पाठवावे, असे आवाहनही त्यांनी केले होते. नंतर शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यताही निर्माण झाली होती. मात्र पक्षप्रवेशाची अट घातल्याने अखेर तो पर्यायही बंद झाला.