लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

जलक्षेत्रातील तांत्रिकतेबाबत आग्रही भूमिका धरणारे तरूण हवेत

‘भूगोल फाऊंडेशन’ तर्फे आयोजित ‘विश्व प्रकृती दिवस’

lokvarta

लोकवार्ता । प्रतिनिधी

पिंपरी : पर्यावरण क्षेत्रात वृक्ष संवर्धन, गड-किल्ले स्वच्छता, जल प्रदुषण ईत्यादी विविध विषयांवर सातत्यपूर्ण कार्यरत अशी संघटना ‘भूगोल फाऊंडेशन’ तर्फे पिंपरी-चिंचवड येथे आयोजित ‘विश्व प्रकृती दिवस’ कार्यक्रमात बोलताना जलशक्ती मंत्रालयाच्या केंद्रीय भूजल विभागातील वरिष्ठ भूजलवैज्ञानिक उपेंद्रदादा धोंडे यांनी जागतिक हवामान बदल आणि स्थानिक पातळीवरील जल समस्या यांचा संबंध दर्शवणारा लेखाजोखा मांडला.

“जागतिकीकरणाच्या परिक्षेपात आपण साधारण नागरिक म्हणून काय करू शकतो याचा विचार करण्याची गरज आहे. पिंपरी चिंचवड परिसरातल्या अनिर्बंध वृक्षकत्तली विरोधात आवाज उठवणारे प्रशांत राऊळ यांचे उदाहरण देत आज अशाच परखड भुमिका घेणाऱ्या तरुणांची गरज असल्याचे मत प्रतिपादन त्यांनी केले. दुष्काळ आणि महापूरानं महाराष्ट्रातील शेतकरी बांधव त्रस्त आहे, प्रशासन जी काही नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करते त्यामुळे शेतकरी बांधवांच्या वेदना संपणार नाहीत, यासाठी दूरदृष्टीचे धोरण गरजेचे आहे, नैसर्गिक आपत्तीचे खापर नियतीवर फोडण्यात अर्थ नाही, जागतिक हवामान बदलासारख्या मूद्द्यावर सामान्य नागरिक म्हणून मी काय करणार अशी हतबलता कामाची नाही, आज अनेकजण वृक्षलागवड, जल संधारण, प्रदूषण निर्मूलन ईत्यादी वेगवेगळ्या मूद्द्यांवर काम करताहेत प्रत्येकानं हातभार लावला तर हे ओझे आपण सहजच उचलूया, सहज जलबोध अभियान माध्यमातून निसर्ग रक्षक निर्माणाचे काम सुरू आहे, हि तरूणाईच भविष्याची आशा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी सूत्र संचालन भूगोल फाऊंडेशनचे विठ्ठल नाना वाळूंज यांनी केले तसेच यावेळी निसर्गराजा मित्र जिवांचे संस्था प्रतिनिधी म्हणून राहूल घोलप, उत्तर महाराष्ट्र जल परिषदेचे भिला पाटील, पिंपरी चिंचवड परिसरातील धडाडीचे निसर्ग रक्षक प्रशांत राऊळ,सायन्स पार्कचे सूनील पोटे, जुन्नर तालुका मित्र मंडळाचे अण्णा मटाले, दिपक सोनवणे व साहेबराव गावडे, कर्नल तानाजी अरबुज, शशिकांत वाडत,राजेंद्र ठाकूर, चंद्रकांत थोरात, राजेश किबिले, नेताजी पाटील अनिल घाडगे,मनोज माकोडे, सुनील बांगर, सुनील काटकर, अरविंद देवकर,राजेश डहाके,एकनाथ फटांगडे, अजिंक्य पोटे असे इतर अनेक भूगोल फाऊंडेशनचे पदाधिकारी-सदस्य आणि ज्योती दर्ंदळे,शोभा फटांगडे, शिला इचके, मिना आखाडे,भारती डहाके अशी मोठ्या प्रमाणावर महिला वर्गाची उपस्थिती होती. सर्वात शेवटी अविनाश खोसे यांनी सर्वांचे आभार मानले .

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani