लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

ऑक्टोबरपासून मोठ्या हौसिंग सोसायटयांकडून ओला कचरा घेणे बंद; महापालिकेचा मोठा निर्णय

लोकवार्ता : येत्या ऑक्टोबरपासून मोठ्या हौसिंग सोसायटयांकडून ओला कचरा घेणे बंद करणार असल्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतला आहे. अशी माहिती अजय चारठणकर, उपायुक्त, आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांनी सांगितले आहे.

मोठ्या सोसायटयांनी त्यांच्या आवारात निर्माण होणारा सर्व ओला कचऱा प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावायची आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड भागातील हौसिंग सोसायटिंना महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने पत्रे दिली आहे. या पत्रात 75 फ्लॅट्स पेक्षा जास्त फ्लॅट्स असणाऱ्या मोठ्या सोसायटी किंवा 100 किलो प्रति दिन कचरा निर्माण करणाऱ्या बल्क वेस्ट जनरेटर यांच्याकडून ओला कचरा घेणे बंद करणार आहे. या मोठ्या सोसायटीने त्यांच्या आवारात निर्माण होणाऱ्या सर्व ओला कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावायची आहे.

ऑक्टोबरपासून

याबाबत चारठणकर यांना विचारले असता ते म्हणाले, महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमार्फत अशी पत्रे सर्व मोठ्या सोसायटी यांना दिली जात आहेत. पुढील आठवड्यात क्षत्रिय कार्यालय स्तरावर आम्ही त्यांच्या हद्दीतील यांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा घेऊ. या कार्यशाळेत हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या प्रतिनिधींकडून ओला कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भातील समस्या जाणून घेतल्या जातील.(Housing society garbage) काही सोसायट्यांना त्यांच्या आवारामध्ये ओला कचरा प्रक्रिया करणारे युनिट उभे करण्यासाठी जागा उपलब्ध नसू शकते. तर काही सोसायटींना अशा युनिट मधून निघणाऱ्या दुर्गंधी मुळे हे युनिट आवारात नको असते. अशा सोसायटीने ऑपरेटरची नेमणूक करावी जे सोसायटीकडून ओला कचरा घेतील व त्यावर प्रक्रिया करतील पण यासाठी सोसायटीला त्यांना पैसे द्यावे लागतील.

तसेच काही महिला बचत गट आहेत जे सोसायटीकडून ओला कचरा घेतील व त्यावर प्रक्रिया करतील पण यासाठी सोसायटीला त्यांना पैसे द्यावे लागतील. अशा ऑपरेटरांची व महिला बचत गटांची ओळख हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या प्रतिनिधींना कार्यशाळेत करून दिली जाईल. पिंपरी-चिंचवड हाऊसिंग फेडरेशनचे व्हाईस चेअरमन तेजस्विनी सवाई – ढोमसे म्हणाल्या की, त्या राहत असलेल्या वाकड मधील शूनेस्ट सोसायटीमध्ये 310 फ्लॅट व 25 दुकाने आहेत. आमच्या सोसायटीमध्ये वाहने पार्किंग करण्यासाठी सुद्धा पुरेशी जागा नाही. (Housing society garbage) त्यामुळे जागे अभावी ओला कचरा प्रक्रिया केंद्र उभारू शकत नाही. तसेच ओला कचरा प्रक्रिया मशीनची किंमत 15 लाख रुपये आहे. ही मशीन 24×7 ऑपरेट करण्यासाठी कामगार ठेवावे लागतील व त्यांना पगार द्यावे लागतील. एवढा खर्च करणे आमच्या सोसायटीला परवडण्यासारखे नाही. महानगरपालिकेने बिल्डरला ओला कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी सांगावे. ओला कचरा प्रक्रिया करण्यातील समस्या संदर्भात लवकरच फेडरेशचे शिष्टमंडळ महानगरपालिका अधिकाऱ्यांना भेटणार आहे.

म्हणून यशवंतरावांनी पांडुरंगाची माफी मागितली । किस्से राजकारणातील

वाकड येथील निसर्ग पूजा सोसायटीचे अरुण देशमुख म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थेचे काम नागरिकांचा कचरा उचलणे, दिवाबत्ती करणे, पाणीपुरवठा करणे व रस्ता करणे असे आहे. शहरामध्ये रस्ते खड्डेमय झालेले आहेत व रस्ते विविध कामांसाठी खोदून ठेवलेले आहेत.(Housing society garbage) महानगरपालिकेकडून वाकड भागाला पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. नागरिक महानगरपालिकेला टॅक्स भरतात त्यामुळे महानगर पालिकेने नागरिकांना मूलभूत सुविधा दिल्या पाहिजेत. माझ्या गावी ग्रामपंचायत मार्फत कचरा उचलला जातो. त्याप्रमाणे महानगरपालिकेने शहरातील नागरिकांचा कचरा उचलला पाहिजे. आमच्या सोसायटीमध्ये ओला कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी जागा उपलब्ध नाही.

वाकड मधील प्लॅटिनम टॉवर्स हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन हर्षद देशमुख म्हणाले की तीन ते चार वर्षांपूर्वी आमच्या सोसायटीने ओला कचरा प्रक्रिया केंद्र उभारले होते. तो चालवण्यासाठी आम्ही एक सुरक्षा रक्षक नेमला होता ज्याला 7 ते 8 हजार रुपये महिना पगार द्यावा लागत असे.(Housing society garbage) सोसायटीतील रहिवाशांनी या केंद्रातून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीबद्दल तक्रारी केल्यानंतर ते केंद्र बंद करण्यात आले होते. महानगरपालिकेने संपूर्ण शहरासाठी एक मोठा ओला कचरा प्रक्रिया केंद्र उभारावा जेणेकरून प्रत्येक सोसायटीला ओला कचरा प्रक्रिया केंद्र उभारावे लागणार नाही.

मोन्ट वर्ट ऑईस्टेरा हाउसिंग सोसायटी मधील रहिवासी दिलीप तिवारी म्हणाले की त्यांच्या सोसायटीमध्ये 82 फ्लॅट्स आहेत. त्यांच्या सोसायटीत एक इंच पण खुली जागा ओला कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी उपलब्ध नाही. बिल्डिंग वरील टेरेसवर सौर ऊर्जा प्रकल्पाचे सौर पॅनल्स लावलेली असल्यामुळे टेरेसवर ओला कचरा प्रक्रिया केंद्र उभारता येत नाही. आमच्या सोसायटीत वाहने पार्किंग करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही.(Housing society garbage) आमच्या सोसायटीतील सर्व नागरिक महानगरपालिकेला टॅक्स भरत असतात त्यामुळे महानगरपालिकेने आमचा कचरा उचलला पाहिजे. महानगरपालिकेने आमचा ओला कचरा उचलला नाही तर नाईलाजास्तव तो आम्हाला रस्त्यावर फेकावा लागेल.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
10 फेमस ट्रेकिंग प्लेस | Best Trekking Place Near Pune महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे काही खास फोटो गुलाबी वेशात सोनालीची अदाकारी | Sonalee Kulkarni प्राजक्ता माळीचा मराठमोळा लुक | Prajakta Mali Marathi Actor या रक्षाबंधनला तुमच्या बहिणीला द्या ‘हे’ गिफ्ट्स