पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असताना जयंत पाटील यांनी किरीट सोमय्यांवर साधला निशाणा
-प्रसिद्धी आणि लक्ष वेधून घेण्यासाठी मोठ्या मोठ्या व्यक्तींवर आरोप करायची सोमय्या यांना सवय -जयंत पाटील
पिंपरी | लोकवार्ता-
प्रसिद्धी आणि लक्ष वेधून घेण्यासाठी मोठ्या मोठ्या व्यक्तींवर आरोप करायची सोमय्या यांना सवय असल्याचा टोला महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटीलयांनी किरीट सोमय्या यांना लगावला आहे. नवाब मालिका यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यावर केलेल्या आरोपांला उत्तर देताना त्यांनी ही टीका केली आहे. सर्व प्रकार उत्तर प्रदेश आणि इतर राज्यातल्या निवडणुका लक्षात घेऊन केवळ लक्ष वेधण्यासाठी हे सर्व सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरीत काँग्रेस कार्यकर्त्याच्या भेटीसाठी नाना पटोल्यांच्या उपस्थितीत राहिले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिसंवाद यात्रेला सुरुवात झाली आहे. या परिसंवाद यात्रेसाठी पिंपरीत उपस्थित असताना जयंत पाटील यांनी ही टीका केली आहे.

आगामी महापालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांची होईल . महापालिका निवडणुकीत आघाडी संदर्भात आमची पहिली पसंती महाविकास आघाडी मधील पक्ष एकत्र आले पाहिजे ही असणार आहे,कुठं अवास्तव मागण्या झाल्या नाही पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा विश्वास हे जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
