लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

पदवीधर, शिक्षक मतदारसंघात कोण विजयी, कोण पराभूत? पहा संपूर्ण आढावा

लोकवार्ता : राज्यातील अमरावती आणि नाशिक पदवीधर सह नागपूर, औरंगाबाद आणि कोकण शिक्षक मतदारसंघापैकी चार मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले आहेत. यात नागपूर, औरंगाबादमध्ये महाविकास आघाडी ला विजय मिळाला आहे. तर नाशिकमध्ये अपक्षाने बाजी मारली आहे. कोकणात मात्र भाजपने विजय खेचून आणला आहे. तर अमरावतीत महाविकास आघाडीचा उमेदवार आघाडीवर आहे. या पाचही निवडणुकीत महाविकास आघाडीचचं वर्चस्व राहिल्याने भाजप आणि शिंदे गटात एकच खळबळ उडाली आहे. केवळ कोकण शिक्षक मतदारसंघातच भाजपला निखळ विजय मिळाला असून इतर ठिकाणी पानीपत झालं आहे. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होमपीचवरही भाजपला पराभव पत्करावा लागल्याने भाजपचं टेन्शन वाढलं आहे.

पदवीधर

कोकणात भाजप
या पाचही मतदारसंघातील निवडणुकीचा सर्वात पहिला निकाल कोकण शिक्षक मतदारसंघाचा लागला. या निवडणुकीत भाजपचा विजय झाला, भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शेकापचे बाळाराम पाटील यांचा पराभव केला. बाळाराम पवार हे विद्यमान आमदार होते. या निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20,800 मते मिळाली. तर शेकापचे बाळाराम पाटील यांना 9500 मते मिळाली. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी 11,300 मताधिक्य घेत आपला विजय नोंदवला आहे.

सत्य की जीत
नाशिकमधील निवडणूक सर्वाधिक चुरशीची आणि लक्ष्यवेधी ठरली. या निवडणुकीत सत्यजीत तांबे विरुद्ध शुभांगी पाटील अशी लढत होती. पण सत्यजित तांबे यांनी हा विजय एकहाती खेचून आणला. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये सुरू असलेल्या मतमोजणीतील चौथ्या फेरीमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना 60 हजार 161 मते पडली. तर महाविकास आघाडी पुरस्कृत असलेल्या शुभांगी पाटील यांना 33,776 मते पडली आहेत. चौथ्या फिर अखेर 1 लाख 12 हजार मतांची मोजणी पूर्ण झाली आहे

या निवडणुकीत सत्यजित तांबे यांना 68 हजार 999 मते मिळाली. तर शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मते मिळाली. तांबे यांनी तब्बल 29 हजार 465 मताधिक्य मिळवून विजय मिळवला.

ajit pawar यांच्यामुळे laxman jagtap दोनवेळा झाले आमदार | लोकवार्ता

चौथ्यांदा विजयी होण्याचा ‘विक्रम’
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात चौथ्यांदा निवडून येण्याचा विक्रम महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांनी केला आहे. विक्रम काळे यांनी भाजपचे उमेदवार किरण पाटील यांचा पराभव केला. या निवडणुकीत विक्रम काळे यांना 23 हजार 577 मिळाली. तर किरण पाटील यांना 16 हजार 663 मते मिळाली. विक्रम काळे यांनी तब्बल 6,914 मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे.

नागपूरमध्ये गाणार यांचा पराभव
नागपूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम पीचवरच भाजपला पराभव स्वीकारावा लागला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना तब्बल 16 हजार 700 मते मिळाली.

अश्विनी जगताप यांनी भाजपसाठी उमेदवारी अर्ज विकत घेतला; भाजपकडून उमेदवारी मिळणार?

तर भाजप पुरस्कृत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांना केवळ 8 हजार 211 हजार मते मिळाली. विशेष म्हणजे नागो गाणार हे दोन टर्म आमदार होते. तरीही त्यांचा पराभव झाला. आडबोले यांनी 8,489 मतांचं मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे.

अमरावतीचा निकाल वेटिंगवर
अमरावती पदवीधर मतदारसंघाचा निकाल अद्याप यायचा बाकी आहे. भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांनी निवडणुकीत अवैध मते पडल्याने फेर मतमोजणीची मागणी केली होती. त्यामुळे फेर मतमोजणी सुरू झालेली आहे. म्हणून अमरावतीचा निकाल लांबला आहे.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani