पवना धरण भरलेले असताना देखील शहरात पाणी टंचाई का ?
अजित गव्हाणे यांचा भाजपवर हल्ला बोल .
पिंपरी । लोकवार्ता
पवना धरण हे सातत्याने शंभर टक्के भरत असतानाही पिंपरी-चिंचवड शहरवासियांवर कृत्रिम पाणीटंचाई करणे भाजपचे अपयश आहे. पाच वर्षांपूर्वी आंद्रा आणि भामा आसखेडचे पाणी मंजूर झाल्यानंतरही संपूर्ण सत्ताकाळात केवळ टक्केवारीच्या भ्रष्ट राजकारणामुळे शहरवासियांचे अत्यंत हाल झाल्याने त्याची परतफेड शहरातील जनता महापालिकेच्या निवडणुकीत नक्कीच करेल आणि भाजपला सत्तेतून बेदखल करेल, अशा शब्दात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

शहरातील नागरिकांवर पाणीटंचाई लादणाऱ्या आणि अडीच वर्षे महापालिकेत पक्षनेते असतानाही आंद्रा आणि भामा आसखेडचे पाणी शहरवासियांना मिळवून देण्यात अपयशी ठरलेल्या भाजपच्या एकनाथ पवार यांनी शहरातील पाणीटंचाईचे खापर प्रशासनावर फोडले आहे. त्याबाबत पवार यांनी केलेल्या आरोपांना अजित गव्हाणे यांनी उत्तर दिले असून गेल्या अडीच वर्षांत शहरवासियांनावर लादलेल्या कृत्रिम पाणीटंचाईवर भाजपवर हल्लाबोल केला आहे.