पुन्हा एकदा उत्तरप्रदेश मध्ये कमळ फुलणार ?
-उत्तरप्रदेश मध्ये भाजप आघाडीवर तर समाजवादी पक्ष दुसऱ्या स्थानी !
उत्तरप्रदेश | लोकवार्ता-
साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालाचे कल हाती आले असून, सध्या तरी भाजपने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. मतमोजणीच्या कलामध्ये भाजप आघाडीवर असल्याचे सध्या दिसते आहे. ते पाहता भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्याचे दिसत आहे. भाजप कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी विजयाचे पोस्टर आणि झेंडे लावायला सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांनी आतापासूनच जल्लोषाची तयारी सुरू केलीय.

भाजप तब्बल दोनशे पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. तर समाजवादी पक्षाने आतापर्यंत शतकी खेळी केल्याचे समोर येतेय. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवली. भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील प्रचारात उपस्थिती लावली. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या नेतृत्त्वात समाजवादी पक्ष आणि आरएलडीने निवडणूक लढवली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण 403 जागा आहेत. येथे बहुमत मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला 202 जागांची गरज आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. आता साडेनऊपर्यंत आलेल्या कलानुसार भाजपने मॅजिक फिगर गाठत 202 जागांवर आघाडी घेतल्याचे समोर येत आहे. समाजवादी पक्षाने शतकी खेळी पूर्ण केली आहे. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये जवळपास शंभर जागांचे अंतर असल्याचे प्राथमिक कलामध्ये दिसत आहे. सध्या आलेल्या कलानुसार बहुजन समाजवादी पक्ष, काँग्रेसला अजूनही दुहेरी आकडाही गाठता आला नाही. दुपारपर्यंत हे चित्र स्पष्ट होईल.