हिवाळी अधिवेशन मुंबईतच?
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उद्या निर्णय होण्याची शक्यता.
मुंबई ।लोकवार्ता-
कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती आणि शासकीय तिजोरीतील खडखडाट, यामुळे पुढील महिन्यात नागपुरात होणारे नियोजित हिवाळी अधिवेशन मुंबईतच होण्याची शक्यता आहे. बुधवारी होणान्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
येत्या ७ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन होईल अशी घोषणा पावसाळी आली होती त्यानुसार गेल्या महिन्यातच अधिवेशनाची तय्यारी सुरु होणे अपेक्षित होते. त्यासाठी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक ऑक्टोबर महिन्यातच होणार होती. मात्र, ती अद्याप झालेली नाही. विधिमंडळातील अधिकान्यांनी बीएसीच्या बैठकीबाबतची फाईल ऑक्टोबरच्या दुसऱ्याच आठवड्यात मुख्यमंत्री कार्यालयात पाठविली आहे. परंतु, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशन होईल, अशी त्यावर अद्याप स्वाक्षरी केली नसल्याने घोषणा पावसाळी अधिवेशनात हिवाळी अधिवेशन नागपुरात होण्याची करण्यात आली होती. त्यानुसार गेल्या शक्यता जवळपास मावळली असल्याचे महिन्यातच या अधिवेशनाची तयारी मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.

हिवाळी अधिवेशनात नागपूरमधील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे महत्त्वाची जबाबदारी असते. उपमुख्यमंत्री यांचे देवगिरी निवास, रविभवन, नागभवन, शेकडो गाळे, आमदार निवास, विधानभवन आदींची रंगरंगोटी करून सुसन्द करावे लागते. अशा इमारती सुसज करून अधिवेशनाच्या ८-१० दिवस आधीच विधानमंडळाकडे हस्तांतरित कराव्या लागतात. ही सर्व कामे पुढील २० दिवसांत करणे आता अवघड असेल. या कामांकरिता निविदा जारी केल्या असल्या, तरी त्याची कोणतीही वर्क ऑर्डरच झालेली नाही. प्रश्नोत्तरे तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी आदी आयुधांचा वापर करण्याबाबत आमदारांना अधिवेशनाच्या दिवस आधीच विधिमंडळ प्रशासनाकडे सादर करावे लागतात. अद्याप कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीची तारीख ठरलेली नाही. अधिकारी कर्मचारीवर्गाची प्रवासाची तिकिटे अद्याप काढली नाहीत.