हिवाळी अधिवेशन लांबणीवर?
मुंबई : लोकवार्ता
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आता डिसेंबरअखेर किंवा जानेवारीत घेण्याचा विचार सुरू आहे. हे अधिवेशन नागपूरला होणार की मुंबईत याबाबतही अद्याप निर्णय झालेला नाही.

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी येत्या १० डिसेंबरला निवडणूक होत असल्याने विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन. एक आठवडा पुढे ढकलण्याची मागणी सर्वच राजकीय पक्षांनी केली. त्यातच मानेवरील शस्त्रक्रियेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना विश्रांतीची गरज असल्याने या दोन कारणांमुळे अधिवेशनाचा मुहूर्त पुढं ढकलण्याचा विचार आहे . मुख्यमंत्र्यांच्या तब्येतिचा अंदाज घेऊन अधिवेशनाची तारीख ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.