आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून मोशीकरांना पाणी समस्येपासून दिलासा
-मोशी- डुडुळगाव पाईप लाईन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात.
मोशी । लोकवार्ता-
कित्तेक दिवसांपासून पाणी समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांना आता या समस्येपासून मोठा दिलासा मिळणार आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून मोशी आळंदी बीआरटी रस्त्यावर नवीन 400 मीमी व्यासाची पाण्याची लाईन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.नागरिकांकडून महेश लांडगे यांचे आभार मानले जात आहे. या कामाची पाहणी नुकतीच पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. काही दिवसात या पाईप लाईनमुळे मोशी तसेच डुडुळगाव परिसरातील नागरिकांना व्यवस्थित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होणार असून, यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मोशी-आळंदी बीआरटी रस्त्यावर नवीन 400 मीमी व्यासाची पाण्याची लाईन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे या कामाची पाहणी मनपाच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी (दि. 4) केली. यावेळी चिखली मोशी- पिंपरी चिंचवड शहर हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, स्वीयसहायक ऋषभ खरात, फेडरेशनचे उपाध्यक्ष धिरज सिंग, नक्षत्र आयलैंड सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.